क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थीक सहाय्य करणे.

नागरी व ग्रामीण भागात क्रीडा सुविधा विकसित करणे, खेळाडूंना क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे, तसेच नियोजन आयोगाने क्रीडा सुविधा निर्मितीमध्ये राज्यशासनाची पुढाकार घ्यावा असे केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयास सुचित केलेले होते. त्यानुसार राज्य शासनाने क्रीडा सुविधा निर्मीतीसाठी योजना कार्यान्वित केली आहे.

पात्र संस्था-
मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, कनिष्ठ/वरीष्ठ, कृषी, वैदयकीय महाविद्यालये, आश्रमशाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपरीषद, महानगरपालिका, जिल्हा परीषद व क्रीडा संकुल इ. संस्था.
अटी व शर्ती :-
 1. स्वत:मालकीची जागा, 15 वर्ष किंवा अधिक जागा असणे आवश्यक आहे.
 2. संस्थेचा 25 टक्के हिस्सा प्रथम खर्च करणे आवश्यक
 3. खर्च सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केले नंतर शासन अनुदानाची रक्कम वितरीत केली जाईल.
 4. प्रशासकीय खर्चासाठी 2 टक्के रक्कम जिक्रीअ कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल.
 5. राज्य शासन व संस्था यांना 75.25 या हिश्यात संस्थांना अर्थ सहाय्य

तालीम कुस्ती केंद्राचा विकास

महाराष्ट्रात कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी तालीम व आखाडयाचे योगदान महत्वाचे असून ग्रामी व शहरी भागात कुस्ती केंद्र व तालिम यांना अद्यावत करण्यासाठी अर्थ सहाय्य देण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे. नोंदणीगृत संस्थांना सदर अनुदानाचा लाभ घेता येईल.

जुन्या तालमींची दुरुस्ती / नुतनीकरण करणे तालमीची दुरुस्ती व नुतणीकरण करणे, सोना,स्टीम बाथ, स्मार्ट पूल, जॅक्युजी व प्रसाधन गृहाचे बांधकाम करणे, प्रशिक्षणासाठी कुस्ती मॅट इ.
अनुदान मर्यादा अंदाजित खर्चाच्या 75 टक्के जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष शासनाने घोषित केलेल्या आदिवासी / दलित वस्तीच्या गावातील आणि आदर्श गावातील संस्थांना 90 टक्के व कमाल रु.7.00 लक्ष अनुदान देण्यात येईल.
अनुदानासाठी पात्र संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत असलेली तालीम क्रीडा मंडळे, संस्था, कुस्ती केंद्र अनुदानासाठी पात्र राहतील. स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत संचलित जुन्या तालमी/आखाडे क्रीडा संस्थ्ज्ञा अनुदानासाठी पात्र राहिती.
अटी व शर्ती :-
संस्थेकडे स्वत:च्या मालकीची किंवा दिर्घ मुदतीच्या कराराची किमान 30 वर्ष कालावधि मंजुरीच्या दिनांकास किमान 10 वर्ष करार कालावधी शिल्लक असावा. तसेच अनुदानाच्या 25 टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक आहे.

अद्यावत व्यायामशाळा विकास व कुस्ती, ज्युदो,कराटे,जिम्नॅटिक्स,ॲथलेटिक्स,वेटलिफटींग,स्वीमींग खेळांचे अद्यावत साहित्य अनुदान

योजनेचा उदेश
व्यायामशाळा,तालीम,आखाडे यांना साहित्य तसेच कुस्ती,ज्युदो,कराटे मॅट स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यान्वित आहे.

लाभाचे स्वरुप संस्थेचा हिस्सा 25 टक्के व शासन अनुदान जास्तीत जास्त रु.1.00 लाख इतके राहिल.
अनुदानाच्या बाबी आधुनिक व्यायामसाहित्य, कुस्ती, ज्युदो/कराटे मॅट, जिनॉस्टिक, ॲथलेटिक्स, वेटलिफिटींग, स्विमींग इ. खेळाचे अद्यावत साहित्य.
अनुदानासाठी पात्र संस्था युवम मंडळे, क्रीडा मंडळे, शैक्षणिक संस्था, पंजीबध्द संस्था असणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती :-
संस्थेकडे किमान 500 चौ.फुट क्षेत्र असणारी व्यायामशाळा असणे आवश्यक

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द खेळाडूंना मानधन

योजनेचा उदेश
राज्याचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केलेल्या खेळाडूंना वृध्दापकाळात सन्मानाने जीवन जगण्यासाठी मानधन देण्यात येते.

स्पर्धास्तर मानधनाचे मासिक दर
राष्ट्रीयस्तर वयोवृध्द खेळाडू रु.2500/-
आंतरराष्ट्रीयस्तर वयोवृध्द खेळाडू आशियाई अजिंक्यपद, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा रु.4000/-
हिंद केसरी, रुस्तमे-हिंद, महान भार केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी किताबप्राप्त कुस्तीगिर अर्जुन पुरस्कारार्थी रु.6000/-
अटी व शर्ती :-
 1. अर्जदार महिला / पुरुष खेळाडूंचे व अर्ज करण्याच्या तारखेस 50 वर्षापेक्षा जास्त असावे.
 2. हिंदकेसरी,रुस्तमे-हिंद, महान भारत केसरी, भारत केसरी किताब मिळविणाऱ्या खेळाडूंना वयाची अट लागू नाही.
 3. मानधन मंजुर झालेला पुरुष खेळाडू दिवंगत झाल्यास पत्नीस मानधन देणे आवश्यक
 4. दुर्दर व्याधीने (उदा.अर्धागवायु, क्षय, कर्करोग, कुष्ठरोग) त्रस्त असलेल्या खेळाडूंना वयाची अट लागू नाही.
 5. रु.1.00 लक्ष वार्षिक उत्पन्न मर्यादा असणारा खेळाडू मानधनास पात्र राहिल. दर दोन वर्षानी उत्पन्न व हयातीचा दाखला देणे आवश्यक
 6. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक, आशियाई किंवा कॉमनवेल्थ यामध्ये किमान एका स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे.
 7. एकविध खेळाच्या राज्य संघटनेने आयोजित केलेल्या खुल्या गटातील राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे किमान पाच वेळा प्रतिनिधीत्व किंवा तीन वर्ष प्रतिनिधीत्व करून प्राविण्यप्राप्त कामगिरी असणे आवश्यक आहे.
 8. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते (अपंग खेळाडू) वयाची व उत्पन्नाची अट पुर्ण करीत असतील तर मानधनासाठी पात्र.

खेळाडूंसाठी गौरव व प्रोत्साहन व बक्षिसे

योजनेचा उदेश
आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय क्रीडा कामगिरी करून राज्याचे नाव लौकि करणाऱ्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांना गौरव प्रोत्साहनपर बक्षिसे देवून सन्मानित करणे आवश्यक आहे

उदिष्ट
आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय क्रीडा कामगिरी करून राज्याचे नाव लौकि करणाऱ्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांना गौरव प्रोत्साहनपर बक्षिसे देवून सन्मानित करणे आवश्यक आहे. अन्य राज्यात ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल तसेच नॅशनल गेम्स इ. स्पर्धामधील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच महाराष्ट्र शासनाने अशा स्पर्धामधील पदक विजेत्या खेळाडूंनाही नजिकच्या काळात रोख पारितोषिके देवून गौरविले आहे.
योजना:-
अ.क्र. स्पर्धा सुवर्ण रौप्य कास्य
1. ऑलिम्पिक स्पर्धा 100.00 75.00 50.00
2. विश्व अजिंक्यपद स्पर्धा 30.00 20.00 10.00
3. एशियन गेम्स 10.00 7.50 5.00
4. राष्ट्रकुल 10.00 7.50 5.00
5. युवा राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन चॅपियनशिप 7.00 5.00 3.00
6. युथ ऑलिम्पिक ज्यु. एशियन, ज्यु. विश्व अजिंक्यपद, शालेय आशियाई स्पर्धा 3.00 2.00 1.00
7. पॅराऑलिंपिक स्पर्धा 30.00 20.00 10.00
8. पॅराएशियन स्पर्धा 3.00 2.00 1.00

अधिकृत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्य संघ सहभागी होण्यासाठी राज्य संघटनाना आर्थिक सहाय्य

योजनेचा उदेश
महाराष्ट्रातील गुणवान खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणे सुलभ व्हावे या हेतूने सदर योजना राबविण्यात येत आहे.

लाभाचे स्वरुप
अधिकृत राज्यस्तरीय संघटनाना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी सवलत दरात प्रवास भाडे व हातीखर्ची भत्ता, क्रीडा गणवेश, ट्रंकसुट इ. आर्थिक सहाय्य देण्यात येते.
अनुदनाच्या बाबी
• प्रवास खर्च (दुसऱ्या वर्गाचे रेल्वेचे सवलतीचे भाडे किंवा राज्य परिवहन महामंडळ प्रत्यक्ष बसभाडेे)
• हातखर्ची भत्ता खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक यांना प्रतिदिन 150 प्रमाणे
• खेळाडूंसाठी गणवेश प्रति खेळाडू रु.150 प्रमाणे, ट्रॅकसूट प्रति खेळाडू रु.500 प्रमाणे
• राष्ट्रीय स्पर्धाकरीता विविध खेळाचे संघ / खेळाडू यांची निवड संबंधित खेळाच्या अधिकृत राज्यसंघटनेव्दारे होणे आवश्यक
• राष्ट्रीय स्पर्धेमध्ये संबंधित संघटनेने निश्चित केलेले खेळाडू संख्या अनुदानासाठी ग्राहय धरण्यात येईल.

क्रीडा नैपुण्य शिष्यवृत्ती

योजनेचा उदेश
भारतीय खेल महासंघ तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण व्दारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये (शालेय, महिला, ग्रामीय (पायका) राज्याच्या संघातील प्रती खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.

प्राविण्य राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना शिष्यवृत्ती वार्षीक रक्कम आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना शिष्यवृत्ती वार्षीक रक्कम
प्रथम क्रमांक 11,250/- 30,000/-
व्दितीय क्रमांक 8,950/- 22,500/-
तृतीय क्रमांक 6,750/- 15,000/-
सहभाग 3,750/- 11,250/-
शालेय क्रीडा स्पर्धा प्राविण्य संपादन करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन
खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धाचा उपयोग होतो. भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय स्पर्धा आयोजन करण्यात येता, प्रतिवर्षी तालुका, जिल्हा,विभाग व राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धामध्ये प्राविण्य संपादन करणाऱ्या शाळांना पारीतोषिक रक्कम देवून सन्मान करणे हा उदेश आहे.
जिल्हास्तर प्रथम व्दितीय तृतीय
प्रतिगट रु.1.00 लक्ष वरु.0.75 लक्ष रु.0.50 लक्ष
राष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात सहभागी होवून प्राविण्य संपादन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट तीन शाळांना रु.2.00 लक्ष प्रत्येकी अनुदान देण्याची तरतुद आहे.
आंतरराष्ट्रीयस्तर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून प्राविण्य संपादन केलेल्या प्रथम तीन क्रमाक पर्यत प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंच्या शाळांना 7.00 लक्ष अनुदान देण्याची तरतुद आहे.
स्पर्धाच्या बाबी
क्रीडागंण देखभाल व दुरुस्ती, क्रीडा साहित्य, क्रीडा वाडमंय, नियमकानिके, क्रीडा विषयक ध्वनी व चित्रफित, खेळाडूंचे प्रशिक्षकाचे मानधन, गणवेश व रोख पारितोषिक.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक / कार्यकर्ता)

क्रीडा / खेळा प्रचार व प्रसार करणाऱ्या तसेच विविध क्रीडा विषयक कार्य करणाऱ्या संघटक/कार्यकर्त्याचा गौरव करण्याच्या हेतुने महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक / कार्यकर्ता) प्रदान करण्याची योजना सन-1970-71 पासुन अंमलात आणली आहे.

क्रीडा / खेळा प्रचार व प्रसार करणाऱ्या तसेच विविध क्रीडा विषयक कार्य करणाऱ्या संघटक/कार्यकर्त्याचा गौरव करण्याच्या हेतुने महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक / कार्यकर्ता) प्रदान करण्याची योजना सन-1970-71 पासुन अंमलात आणली आहे.
• वयाची 50 वर्ष पुर्ण, महिलांसाठी 40 वर्ष पुर्ण आवश्यक आहे.
• पुरस्काराचे स्वरुप- गौरवपत्र,स्मृतिचिन्ह, रोख रु.1.00 लक्ष, ब्लेझर इ.
• विकासात्मक कार्य- क्रीडागंण, व्यायामशाळा बांधणे, क्रीडा मंडळाची स्थापना करणे
• संघटनात्मक कार्य- क्रीडा मंडळ व संघटना स्थापना व पदाधिकारी
• क्रीडा स्पर्धा भरविणे- जिल्हा,विभाग,राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय इ. स्पर्धा आयोजन करणे
• पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामिगरी
• क्रीडा प्रचार व प्रसार- चर्चासत्र,परिसंवाद,प्रात्यक्षिके,पुस्तक प्रकाशन,मासिके, वर्तमानपत्र,आकाशवाणी,दुरदर्शन इ. भाषणे
• किमान 60 गुण आवश्यक विकासात्मक कार्य व संघटनात्मक कार्य,क्रीडा प्रचार व प्रसार यांना 60 टक्के गुण आवश्यक

जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार

क्रीडा प्रचार व संघटक म्हणुन कार्याचा गौरव करण्यासाठी राज्यातुन सर्वोत्कृष्ट कामगिरी व योगदान असणाऱ्या एका महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.

क्रीडा प्रचार व संघटक म्हणुन कार्याचा गौरव करण्यासाठी राज्यातुन सर्वोत्कृष्ट कामगिरी व योगदान असणाऱ्या एका महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप- गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये- 1.00 लक्ष, ब्लेझर इ.
• महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय आंतररार्ष्टीय स्तरावर उज्वल करणाऱ्या महिला क्रीडा मार्गर्शकांचा गौरव करण्यासाठी सन-2004-05 या वर्षापासुन जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार हा महिला क्रीडा मार्गदर्शकांना देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

साहसी क्रीडा पुरस्कार

पुरस्काराचे स्वरुप- गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये- 1.00 लक्ष, ब्लेझर इ.

पुरस्काराचे स्वरुप- गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये- 1.00 लक्ष, ब्लेझर इ.
• खाडी, समुद्र,गिर्यारोहण,सायकल जग प्रवास,मोटोक्रास,पॅराग्लायडिंग/पॅराजम्पिंग, आईस स्केटीग इ.आंतरराष्ट्रीय कामगिरी

क्रीडा प्रबोधिनी

महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने योजना राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने योजना राबविण्यात येत आहे.
क्रीडा प्रबोधिनी खेळ व ठिकाण :-
• राज्यात पुणे,कोल्हापुर,सांगली,ठाणे,अमरावती,अकोला,नाशिक,नागपुर,प्रवरानगर,औरंगाबाद व गडचिरोली अशा 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहे.
खेळ प्रकार :-
• ज्युदो,जिम्नॅस्टीक्स,हॉकी,शुटींग,फुटबॉल,जलतरण,डायव्हींग,ॲथलेटिक्स,कुस्ती, बॅडमिटन,आर्चरी,हॅन्डबॉल,टेबल टेनिस, वेटलिफटींग व बॉक्सिंग अशा 15 क्रीडा प्रकारात मार्गदर्शन केले जाते.
पुरविण्यात येणाऱ्या सुविधा :-
• प्रशिक्षणार्थींना विविध खेळाचे तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांडुन तंत्रशुध्द प्रशिक्षण सकाळ व सांयकाळ अशा दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाते.
• प्रशिक्षणार्थी खेळाडूंना निवास, भोजन,खेळ,गणवेश याबाबतचा संपुर्ण खर्च शासनामार्फत केला जातो.
• क्रीडा प्रबोधिनीमध्ये एकुण 750 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात.
खेळाडू निवडण्याची पध्दत :-
• क्रीडा व युवक सेवा संचालनालय व्दारा प्रतिवर्षी क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरीता बॅटरी ऑफ टेस्टचे आयोजन केले जाते.
• तालुकास्तर व जिल्हास्तरावर 9 चांचण्याचे (उंची,वजन,30 मी.धावणे,उभे राहून लांब उडी,800मी धावणे,उभी उंच उडी, (6x10 मी. शटल रन,लवचिकता,मेडीसीन बॉल थ्रो) आयोजन केले जाते.
• 9 चाचण्यातुन एकुण 27 गुणापैकी किमान 17 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणीसाठी निवड करण्यात येते, वैद्यकीय तपासणी अहवालानुसार प्रशिक्षणार्थीची अंतिम प्रवेशासाठी निवड करून क्रीडा प्रबोधिनीसाठी प्रवेश निश्चित केला जातो.
• राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट प्रवेश (अटी लागू)

10 वी व 12 वी शालांत परिक्षेतील खेळाडूंना वाढीव 25 क्रीडा गुण सवलत

शालेय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत स्पर्धा, ग्रामीण, महिला, सुब्रतो फुटबॉल, नेहरु हॉकी, भारतीय ऑलिपिंक व महाराष्ट्र ऑलिपिंक एलग्न एकविध खेळ संघटना आयोजित स्पर्धाना लाभ.

शालेय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत स्पर्धा, ग्रामीण, महिला, सुब्रतो फुटबॉल, नेहरु हॉकी, भारतीय ऑलिपिंक व महाराष्ट्र ऑलिपिंक एलग्न एकविध खेळ संघटना आयोजित स्पर्धाना लाभ.
• दि. 01 जुन ते 29 फेब्रुवारी हा कालावधी ग्राहय
• उच्चतम कामगिरीसाठी सवलत गुण
• एक किंवा अनेक विषयात अनुउत्तीर्ण झाल्यास तसेय उर्तीणी विदयार्थ्यीना अनुज्ञेय
• आंतरराष्ट्रीय सहभाग व राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्य खेळाडूस 25 गुण
• राज्यस्तर सहभाग व राज्य प्राविण्य खेळाडूस 20 गुण
• राज्यस्तर सहभाग खेळाडूस 15 गुण
• इयत्ता 9 व 11 वी वर्गातील विदयार्थ्यीना गुण देण्यात यावेत.
• इयत्ता 1 ली ते 8 वी तील विदयार्थ्यीना जिल्हा,विभाग,राज्य व राष्ट्रीय प्राविण्य संपादन केल्यास गुण
• 100 टक्के पेक्षा अधिक सरासरी होऊ नये.
• राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना 11 वी प्रवेशामध्ये विशेष सवलत देवून उपजत क्रीडागुण असलेल्या मुला-मुलींना खेळाकडे. आकर्षिले जावे यासाठी खेळाडूंना 3 टक्के जागा राखीव ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतलेला आहे.

स्वयंसिध्दा महिलांकरीता स्वंसरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम

शहरी /ग्रामीण भागातील अस्थिर व अनुरक्षित जीवनमान लक्षात घेता महिलांना स्वतच्या संरक्षणासाठी निर्भय,समक्ष, स्वयंसिध्दा व्दारा संरक्षणाचे व स्वंरक्षणाबाबतची भिंती महिलांच्या मनातुन घालवुन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व निर्णय शमता निर्माण करणे.

शहरी /ग्रामीण भागातील अस्थिर व अनुरक्षित जीवनमान लक्षात घेता महिलांना स्वतच्या संरक्षणासाठी निर्भय,समक्ष, स्वयंसिध्दा व्दारा संरक्षणाचे व स्वंरक्षणाबाबतची भिंती महिलांच्या मनातुन घालवुन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व निर्णय शमता निर्माण करणे.
• स्वंयसिध्दा प्रशिक्षणासाठी 10 दिवसाचा तंत्रसुध्द अभ्यासक्रम
• महिलांना स्वरंक्षणाचे डावपेच (ज्युदो,तायक्वांदो,मार्शल आर्ट, लाठी-काठी) अरोबिक्स, शारीरिक तंदुरुस्तीचे व्यायाम प्रकार, योगासन, हास्यउपचार पध्दती, स्वयंरोजगार इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.
• प्रशिक्षण दरम्यान महिलांना विविध (स्त्रियांच्या सर्वागिण विकासासाठी शरीरचना स्थायु दुखापती, खेळाडूचे मानसिक व शारीरिक पुनवर्सन,महिलाचे आरोग्य आहार मार्गदर्शन,व्यक्तिमत्व विकास, जिम-योगा,एरोबीक्स, फिटनेस ट्रेनिंग, व्यवसाय मार्गदर्शन, स्वयरोजगार आणि करीअर मार्गदर्शन, होम मॅनेजमेंट, फायरब्रिगेंड, ट्रेनिग संकल्पना-प्रात्यशिके, ट्रॅफिक नियम-महिती व प्रात्यक्षिकाम महिलाच्या समस्या व निराकरण व महिला विषयक कायदयातील तरतुदी इ. ) विषयावर तज्ञा मार्फत व्याख्यान आयोजित करण्यात येतात.
• स्वयंसिध्दा प्रशिक्षीत मास्टर ट्रेनर्सना प्रतिमाह रु.500/- शासन मानधन तसेच प्रशिक्षणार्थीकडून रु.100/- शुल्क घेण्याची मुभा आहे.

अनिवासी क्रीडा प्रबोधिनी

राज्यातील उदयोमुख खेळाडूसाठी निवासी क्रीडा प्रबोधिनी योजना दि.18 नोव्हेंबर 1995 च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वित आली आहे. यानंतर वसतिगृहात न राहता क्रीडा प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूसाठी अनिवासी क्रीडा प्रबोधिनी योजना दि.9 जुलै 1999 च्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आली आहे.

राज्यातील उदयोमुख खेळाडूसाठी निवासी क्रीडा प्रबोधिनी योजना दि.18 नोव्हेंबर 1995 च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वित आली आहे. यानंतर वसतिगृहात न राहता क्रीडा प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूसाठी अनिवासी क्रीडा प्रबोधिनी योजना दि.9 जुलै 1999 च्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या उदेश खेळाडूना स्थानिक स्तरावर खेळाडूच्या उत्तम सुविधाव तांत्रिक प्रथिरुण दिव्यात खेळाच्या दर्जा उंचावण्यास मदत होईल. पालक आपल्या आपल्यांना घरा पासुन लाब ठेवण्यास तयार नसतात त्याचप्रमाणे पुणे, कोल्हापुर येथील शुंटीग या खेळातील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीचे यश लक्षात घेऊन क्रीडा धोरण समितीने राज्यात अनिवासी क्रीडा प्रबोधिनी मोठया प्रमाणात स्थापनाची शिफारस केली आहे. यानुसार अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुधारीत शासन निर्णय दि.21 सप्टेंबर 2013 रोजी निर्णमित केला आहे.
प्रवेश पध्दत :-
अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता अधिकृत राज्य/राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल व इतर खेळ प्रकारानुसार विविध कौशल चाचणीच्या आधारे प्रवेश दिला जाईल.
सोयी सुविधा :-
प्रशिक्षण सुविधा, क्रीडा सुविधा उपलब्ध, तज्ञ प्रशिक्षण, क्रीडा सामुग्री सुविधा, क्रीडा गणवेश व कीट, आहार, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक अभ्यासक्रम, स्वखर्चाचे चालु ठेवतील.

राज्यातील आंतररार्ष्टीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षिस देवून गौरविणे

राज्याचे क्रीडा धोरण 2012च्या अनुषंगाने शासन निर्णय क्र.राक्रीधो/2012/प्र.क्र.157/12 क्रीयुसे2, दि.05फेब्रुवारी 2014 अन्वये राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देवून गौरविण्याची योजना कार्यान्वीत करण्यास शासनाने मान्यता व मंजुरी दिलेली आहे.

राज्याचे क्रीडा धोरण 2012च्या अनुषंगाने शासन निर्णय क्र.राक्रीधो/2012/प्र.क्र.157/12 क्रीयुसे2, दि.05फेब्रुवारी 2014 अन्वये राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देवून गौरविण्याची योजना कार्यान्वीत करण्यास शासनाने मान्यता व मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र आंतररार्ष्टीयस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना तसेच त्यांचे क्रीडा मार्गदर्शक / प्रशिक्षक यांना गौरव पारितोषिके देवून गौरव करण्याबाबत राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्यशनाने यापूर्वी रोख बक्षीसे देवून गौरव करण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शक / प्रशिक्षकांना ऑलिम्पिक, विश्व अजिंक्यपद, एशियन गेम्स, राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल, एशियन चॅम्पीयनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनिअर एशियन अजिक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक, पॅरा एशियन या स्पर्धाकरीता रोख रक्कमचे पारितोषिक देवून गौरविण्यात येते.

राज्यातील क्रीडा सुविधा सर्वेक्षण करणे

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या अनुषंगाने शासन निर्णय क्रं.राक्रीधो/3113/प्र.क्र.46/क्रीयुसे3, दि.26/02/2014 अन्वये राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्था मार्फत विकसित करण्यात आलेल्या क्रीडा सुविधाची माहिती संकलित करुन सार्व सामान्य जनतेस व खेळाडूंना उपलब्ध व्हावी तसेच जिथे क्रीडा सुविधा उपलब्ध नाहीत तेथे नव्याने क्रीडा सुविधा उपलब्ध करणे, या उदेशाने क्रीडा विभागामार्फत सदर सुविधाचे सर्वेक्षण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या अनुषंगाने शासन निर्णय क्रं.राक्रीधो/3113/प्र.क्र.46/क्रीयुसे3, दि.26/02/2014 अन्वये राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्था मार्फत विकसित करण्यात आलेल्या क्रीडा सुविधाची माहिती संकलित करुन सार्व सामान्य जनतेस व खेळाडूंना उपलब्ध व्हावी तसेच जिथे क्रीडा सुविधा उपलब्ध नाहीत तेथे नव्याने क्रीडा सुविधा उपलब्ध करणे, या उदेशाने क्रीडा विभागामार्फत सदर सुविधाचे सर्वेक्षण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये जिल्हयाातील स्थानिक स्वराज्य संस्था, महसुल विभाग,शिक्षण विभाग, खाजगी संस्था यांच्या सहाय्याने जिल्हा निहाय उपलब्ध माहिती एकत्रित करुन त्या आधारे लोकप्रिय क्रीडा प्रकार, उपलब्ध सुविधा, खेळाडू संख्या आवश्यकता इ. बाबीचा विचार करुन क्रीडा सुविधा विकसीत करणे

राज्याचे क्रीडा धोरण़

देशात क्रीडा धोरण जाहिरत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, खेळाडू हा केंद्रबिंदू मानून सन-1996 मध्ये सर्वप्रथम क्रीडा धोरण तयार करण्यात आले. या क्रीडा धोरणचा कालावधी सन-2000 पर्यंत निश्चित करण्यात आला होता


देशात क्रीडा धोरण जाहिरत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, खेळाडू हा केंद्रबिंदू मानून सन-1996 मध्ये सर्वप्रथम क्रीडा धोरण तयार करण्यात आले. या क्रीडा धोरणचा कालावधी सन-2000 पर्यंत निश्चित करण्यात आला होता.
• सन-1996 मधील क्रीडा धारेणाची फलश्रुती व क्रीडा विकासाची दिशा लक्षात घेऊन नवीन क्रीडा धोरण सन-2001 मध्ये जाहिर करण्यात आले.
• राज्यचे क्रीडा धोरण ठरविण्यासाठी शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रं.क्रीडाधो-2006/प्र.क्र.167/06/क्रीयुसे-1, दि.20 फेब्रु. 2010 अन्वये मा.मंत्री,क्रीडा व युवक कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
• राज्याचे नवीन युवा धोरण 2011 प्रारुप मसुदा समितीने दि. 15 फेब्रुवारी 2011 रोजी मा.मुख्यमंत्री महोदयाकडे सादर केला व सन2012 मध्ये या धोरणास शासनाने मंजुरी दिलेली आहे. धोरणाचा प्रारुप मसुदा क्रीडा विभागाच्या www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

व्यायामशाळा विकास अनुदान

योजनेचा उदेश
तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुढ व निरोगी करण्यासाठी व्यायाम संस्थाना आधुनिक साहित्य/ नविन व्यायामशाळा बांधकाम/नुतनीकरण इ. साठी अनुदान देण्याची योजना कार्यरत आहे.

लाभाचे स्वरुप
 1. • व्यायामशाळा विकासासाठी जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष किंवा अंदाजित खर्चाच्या 75 टक्के अनुदान देण्यात येते.
 2. • विशेष घटक दलीत वस्तीत तथा आदिवासी भाग, आदर्श गाव यांना जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष किंवा अंदाजित खर्चाच्या 90 टक्के
 3. • शासकीय विभाग स्थानिक स्वराज्य संस्था, संकुल समिती आदिवासी आश्रमशाळा / वसतिगृहे या संस्थांना 100 टक्के किंवा रु.7.00 लक्ष अनुदान देण्यात येते.
अनुदानाच्या बाबी
 1. • किमान 500 चौरस फुट चटई क्षेत्र असलेली व्यायामशाळा बांधकाम, प्रसाधन गृह, स्थानगृह , भांडारगृह इत्यादी बांधकामासाठी अनुदान दिले जाते.
 2. • जुनी व्यायामशाळा आखाडे तालमीचे नुतनीकरण
 3. • अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदीसाठी अनुदान
अटी व शर्ती :-
 1. • संस्थेकडे स्वत:च्या मालकीची किंवा दिर्घ मुदतीच्या करारावर (किमान 30 वर्ष) क्रीडागंणासाठी राखून ठेवलेली जागा आवश्यक.
 2. • संस्थेने स्व:हिस्सा 25 टक्के खर्च करणे आवश्यक आहे.
 3. • स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपरीषद, महानगरपालिका, जिल्हा परीषद,
 4. • खाजगी शैक्षणिक संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या व शिक्षण विभागाने मान्यता दिलेल्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय.
 5. • सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणी असलेल्या एकविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या पंजीबध्द क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, युवकमंडळे, महिला मंडळे.
 6. • स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक/माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा, शासकीय विभाग, शासकीय क्रीडा संकुले इ. अनुदानासाठी पात्र आहेत.
 7. • क्रीडा विभागाच्या विविध समित्या, पोलिस विभाग,

युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी युवक मंडळे/संस्थाना आर्थिक सहाय्य (समाजसेवा शिबीर व ग्रामीण नागरी भागातील युवक मंडळना आर्थिक सहाय्य)

योजनेचा उदेश
युवकांच्या सर्वागिण विकासासाठी तसेच युवांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी उदयुक्त करणेसाठी योजना राबविण्यात येत आहे.

लाभाचे स्वरुप
 1. • ग्रामीण व झोपडपटी भागात समाजसेवा शिबीराचे आयोजन
 2. • अस्पृश्यता, बालविवाह विरोधी मोहित
 3. • प्रथमोपचार, नेत्र व आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करणे
 4. • युवक आदान व प्रदान कार्यक्रम
 5. • व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम
 6. • तालुका,जिल्हास्तराव युवक तसेच राज्यस्तरावर महोत्सवाचे आयोजन
 7. • युवक पत्रिका प्रकाशान करणे
 8. • युवकांच्या समस्यवर कविता गायन,वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र, वत्कृत्व स्पर्धा आयोजन करणे
 9. • ग्रामीण विकास कार्यक्रम उदा.-वृक्षरोप, आरोग्य, स्वच्छता शिबीर
 10. • बेरोजगार युवकांसासाठी कार्यशाळा करणे
 11. • सांसकृतिक कार्यक्रम उदा.-नाटय, संगीत, नृत्य इ. कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करणे.
अटी व शर्ती :-
सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणी असलेल्या एकविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या पंजीबध्द क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, युवकमंडळे, महिला मंडळे.

महाराष्ट्र क्रीडा परीषदेच्या निधितून आर्थिक सहाय्य

योजनेचे स्वरुप
राज्यात क्रीडा खेळांच्या विकासासाठी कार्य करीत असलेल्या एकविध खेळाच्या राज्य व जिल्हा, संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे यांना निर्वाह अनुदान, क्रीडा साहित्य खरेदीसाठी अनुदान, अधिकृत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजन, क्रीडागंणाची दुरुस्ती व देखभाल सहाय्यक अनुदान देऊन प्रोत्साहीत करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. राज्य, जिल्हा व क्रीडा संस्थांना खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते
संस्था बाब प्रचलित अनुदान मर्यादा राज्य संघटना निर्वाह अनुदान राज्य संघटनेशी सलग्न प्रत्येक जिल्हयाप्रमाणे रु.1000/- किंवा प्रत्येक खर्चाच्या 50 टक्के क्रीडा साहित्य रु.5000/- जिल्हा संघटना निर्वाह अनुदान रु.5000/- क्रीडा साहित्य रु.5000/- स्थानिक मंडळे, क्रीडा संस्था निर्वाह अनुदान रु.500/- क्रीडा साहित्य रु.2000/- राज्य संघटना, क्रीडा मंडळे स्पर्धा अनुदान अ.- राज्यस्तरीय स्पर्धा रु.1.00 लाख ब.- राष्ट्रीय स्पर्धा रु.2.00 लाख क.- आंतरराष्ट्रीय स्पर्धा रु.2.00 लाख

लाभाचे स्वरुप
 1. • ग्रामीण व झोपडपटी भागात समाजसेवा शिबीराचे आयोजन
 2. • अस्पृश्यता, बालविवाह विरोधी मोहित
 3. • प्रथमोपचार, नेत्र व आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करणे
 4. • युवक आदान व प्रदान कार्यक्रम
 5. • व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम
 6. • तालुका,जिल्हास्तराव युवक तसेच राज्यस्तरावर महोत्सवाचे आयोजन
 7. • युवक पत्रिका प्रकाशान करणे
 8. • युवकांच्या समस्यवर कविता गायन,वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र, वत्कृत्व स्पर्धा आयोजन करणे
 9. • ग्रामीण विकास कार्यक्रम उदा.-वृक्षरोप, आरोग्य, स्वच्छता शिबीर
 10. • बेरोजगार युवकांसासाठी कार्यशाळा करणे
 11. • सांसकृतिक कार्यक्रम उदा.-नाटय, संगीत, नृत्य इ. कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करणे.
अटी व शर्ती :-
सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणी असलेल्या एकविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या पंजीबध्द क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, युवकमंडळे, महिला मंडळे.

कुस्ती कलेचा विकास कुस्तीगीरांना मानधन

योजनेचा उदेश
राज्याचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केलेल्या खेळाडूंना वृध्दापकाळात सन्मानाने जीवन जगण्यासाठी मानधन देण्यात येते.

उदिष्ट
राज्याचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केलेल्या खेळाडूंना वृध्दापकाळात सन्मानाने जीवन जगण्यासाठी मानधन देण्यात येते.
अटी व शर्ती :-
 1. अर्जदार महिला / पुरुष खेळाडूंचे व अर्ज करण्याच्या तारखेस 50 वर्षापेक्षा जास्त असावे.
 2. हिंदकेसरी,रुस्तमे-हिंद, महान भारत केसरी, भारत केसरी किताब मिळविणाऱ्या खेळाडूंना वयाची अट लागू नाही.

राष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरे आयोजनासाठी अधिकृत राज्य संघटनाना आर्थिक सहाय्य

योजनेचा उदेश
क्रीडा सांस्कृतिक जोपासना व वाढ करण्यासाठी राज्य संघटनाना राष्ट्रीय स्पर्धापुव प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्याची योजना कार्यान्वित आहे.

लाभाचे स्वरुप
• प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.15000/- इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते.
• प्रशिक्षण शिबीरासाठी वयोगटानिहाय स्वतंत्र आर्थिक सहाय्य देण्यात येते.
अनुदनाच्या बाबी
• खेळाडू, प्रशिक्षक यांचा निवास व भोजन खर्च.
• खेळाडू, प्रशिक्षक यांचा प्रवास खर्च (दुसऱ्या वर्गाचे रेल्वेचे सवलतीचे भाडे किंवा राज्य परिवहन महामंडळ प्रत्यक्ष बसभाडे)
• क्रीडागंणाची देखभाल/भाडे
• आवश्यक क्रीडा साहित्य
रार्ष्टीय स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचा कालावधी किमान 7 दिवस असावा. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये संबंधित संघटनेने निश्चित केलेले खेळाडू संख्या अनुदानासाठी ग्राहय धरण्यात येई.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी सहाय्यक अनुदान

योजनेचा उदेश
राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी दाखविण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी, दर्जा सुधारण्यासाठी सहाय्यभूत ठरतील, अशा बाबीसाठी अर्थसहाय देण्याची योजना मंजुर केलेली आहे.

लाभाचे स्वरुप
• खेळाडूंचा दर्जा सुधारण्यासाठी सहायभूत बाबींवर होणारा खर्च रु.5.00 लाखच्या मर्यादेत देण्यात येतो.
• क्रीडा स्पर्धा सहभागासाठी रु.1.00 लक्ष प्रवास शुल्क, प्रवेश शुल्क, निवास शुल्क, भोजन खर्च इ.
• राष्ट्रीय शालेय स्पर्धा तसेच एकविध खेळ संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील दोन सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना आंतररार्ष्टीय स्पर्धाच्या तयारी करण्यासाठी रु.2.00 लक्ष
खर्चाच्या बाबी
• क्रीडा साहित्य आयात करणे, क्रीडा गणवेश, क्रीडा प्रशिक्षणासाठी देशांतर्गत व देशाबाहेरील प्रवास, निवास व भोजन, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, चित्रर्फित, पुस्तके इ.
• खेळाडू ऑलिम्पिक,कॉमनवेल्थ, राष्ट्रकुल, एशियन गेम्स, एशियन कप, राष्ट्रकुल युवा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. विश्व अजिंक्यपद, वर्ल्ड कप, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिपिंक, पॅरा एशियन, ज्यु. एशियन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारे कनिष्ठ व वरिष्ठ गटातील खेळाडू,
• राष्ट्रीय स्पर्धेमध्ये संबंधित संघटनेने निश्चित केलेले खेळाडू संख्या अनुदानासाठी ग्राहय धरण्यात येईल.
खेळाडूंना सहाय्यक अनुदान राज्य शासनास शिफारस करण्यासाठी समिती
1. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, म.रा. पुणे अध्यक्ष
2. सहसंचालक, क्रीडा व युक सेवा, म.रा. पुणे सदस्य
3. अर्जुन पुरस्कारार्थी / ऑलिपियन/आंतररार्ष्टीय खेळाडू सदस्य
4. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा प्रतिनिधी सदस्य
5. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, (संबंधित विभाग) सदस्य सचिव

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामधून क्रीडा आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अनुज्ञेय क्रीडा विषयक विकासासाठी सहाय्यभु करणाऱ्या बाबीसाठी अनुदान देण्यात येती.
योजनेचा उदेश
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामधून क्रीडा विकासासाठी सहाय्यभुत करणाऱ्या बाबीसाठी अनुदान देण्यात येते.

प्राविण्य राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना शिष्यवृत्ती वार्षीक रक्कम आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना शिष्यवृत्ती वार्षीक रक्कम
प्रथम क्रमांक 11,250/- 30,000/-
व्दितीय क्रमांक 8,950/- 22,500/-
तृतीय क्रमांक 6,750/- 15,000/-
सहभाग 3,750/- 11,250/-
लाभाचे स्वरुप
व्यायामशाळांसाठी कायम स्वरुपाचे साहित्य व इतर उपकरणे खरेदी करणे.
स्पर्धा आयोजनास आर्थीक सहाय्य अनुदान तपशिल
स्थानिक क्रीडा स्पर्धा रु.5.00 लक्ष
जिल्हा क्रीडा स्पर्धा रु.5.00 लक्ष
राज्य क्रीडा स्पर्धा रु.12.00 लक्ष
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रु.15.00 लक्ष
अनुदानाच्या बाबी
• शासकीय तसेच स्थानिक संस्थांनी बांधलेल्या व्यायाम शाळांना सहाय्य देता येईल.
• क्रीडागंणाची कामे क्रीडा विभागाच्या क्रीडागंण विकास योजनेच्या निकषानुसार शासकीय व शासन अनुदानीत प्राथमिक/माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा यांच्याकरीता करता येईल.
• शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किंवा एकविध खेळांच्या अधिकृत संघटनाव्दारा आयोजित क्रीडा स्पर्धा

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)

क्रीडा क्षेत्रातील विविध उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उदिष्ट आहे. महाराष्ट्रा शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना सन-1969-70 पासुन कार्यान्वित आहे.

क्रीडा क्षेत्रातील विविध उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उदिष्ट आहे. महाराष्ट्रा शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना सन-1969-70 पासुन कार्यान्वित आहे.
• प्रतिवर्षी एका खेळासाठी एक पुरुष व एक महिला खेळाडूंची निवड
• आलिंपिक, जागतिक स्पर्धा, प्राविण्य व सहभाग थेट पुरस्कार
• आशियाई व कॉमनवेल्थ गेम्स क्रीडा स्पर्धा प्राविण्य थेट पुरस्कार
• एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, आशियाई व राष्ट्रकुल अजिंक्यपद, युथ ऑलिंपिंक, नॅशनल गेम्स,वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद, वरिष्ठ राज्य अजिक्यपद, कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद, शालेय क्रीडा स्पर्धा या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त कामगिरी
• सांघिक क्रीडा प्रकारात- किमान 90 गुण आवश्यक
• वैयक्तिक प्रकारात 125 किंवा अधिक गुण
• वजनगट असणाऱ्या क्रीडा प्रकारात 90 किमान जास्त गुण
• 5 वर्षापैकी 3 वर्षाचे सर्वोत्तम गुण मुल्यकणसाठी ग्राहय
• 1 जुलै ते 30 जून या कालावधित वर्ष निहाय कामगिरी मुल्यमापन

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अंपग खेळाडू)

शारीरिक दृष्टया विकलांग असुन क्रीडा क्षेत्रातील विविध उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अपंग खेळाडूंचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सन-1977-78 पासुन प्रदान करण्यात येत आहे.

शारीरिक दृष्टया विकलांग असुन क्रीडा क्षेत्रातील विविध उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अपंग खेळाडूंचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सन-1977-78 पासुन प्रदान करण्यात येत आहे.
पुरस्काराचे स्वरुप- गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये- 1.00 लक्ष, ब्लेझर इ.
• एक पुरुष व एक महिला खेळाडूंना पुरस्कार
• राष्ट्रीय व राज्य पॅरा ऑलिपिक कमिटी व्दारा आयोजित वरीष्ठ गटातील स्पर्धा
• आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेतील 1 ते 4 क्रमांकाची कामगिरी पात्र राहिल.

जिल्हा क्रीडा पुरस्कार

जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना त्यांच्या कार्याचे / योगदान मुल्यमापन होऊन त्यांचया गौरव करण्याच्या दृष्टीने सन-2002 पाहुन जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.

जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना त्यांच्या कार्याचे / योगदान मुल्यमापन होऊन त्यांचया गौरव करण्याच्या दृष्टीने सन-2002 पाहुन जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप- गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये- 10000/- इ.
• गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- 1
• गुणवंत क्रीडा संघटक- 1
• गुणवंत खेळाडू- पुरुष-1 व 1 महिला

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना, शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण

महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने योजना राबविण्यात येत आहे.
थेट नियुक्ती
गट अ - ऑलम्पिक, जागतिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स,
गट ब - आशियाई चॅम्पियन शिप, ज्यु. वर्ल्ड कप, युथ ऑलिपिंक
गट क - वरील स्पर्धा मधील प्राविण्य व सहभागी खेळाडू
गट ड - साऊथ एशिन चॅम्पियन शिप, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप किमान 6 देश पॅरा ऑलिंपिक व पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स प्रथम क्रमांक
गट अ पात्र क्रीडा स्पर्धा ऑलिंपिक,आशियाई,जागतिक,एशियन चॅम्पियनशिप,कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप युथ ऑलिपिक, ग्रॅडमास्टर, पॅरागेम्स, पॅरा एशियन्स, जागतिक विद्यापीठ आयोजित खेळ, शालेय महासंघ व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय खेळ, यामध्ये ऑलिपिक व आशियाई कॉमनवेल्थ या स्पर्धा तसेच कबडी व खो-खो क्रीडा स्पर्धा 4 टक्केसाठी पात्र
गट ब पात्र क्रीडा स्पर्धा गट अ साठी विहीत अहर्ता तसेच आंतरराष्ट्रीय कनिष्ठ, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप, युथ कॉमनवेल्थ गेम्स, कनिश्ठ एशियन व कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, बुध्दीबळ मास्टर स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, वरीष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय शालेय व ग्रामीण, अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा
गट क पात्र क्रीडा स्पर्धा गट अ व ब साठी विहीत अहर्ता, राष्ट्रीय कनिष्ठ क्रीडा स्पर्धा, वरिष्ठ राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद, राज्यस्तर शालेय, ग्रामीण व महिला, राज्यस्तर अश्वमेघ, राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर पॅरा ऑलिपिंक, राज्यस्तर अपंग क्रीडा स्पर्धा
गट ड पात्र क्रीडा स्पर्धा गट अ,ब व क साठी विहीत अहर्ता, राज्यस्तर कनिष्ठ, वरीष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहभाग, पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरीष्ठ सहभाग
प्रमाणपत्र पडताळणी • खेळाडू ज्या क्रीडा विभागात वास्तवास आहे त्या विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, हे प्रमाणपत्र पडताळणे करतील.
• कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर 20 दिवसात कार्यलयाने कार्यवाही करावी.
• विभागीय उपसंचालक, यांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप असल्यास 2 महिन्याचे आत प्रथम अपील मा.सहसंचालक, क्रीडा विभाग, पुणे याचे कडे तर व्दितीय अपील मा.आयुक्त, क्रीडा विभाग, पुणे यांचेकडे करीता येईल.
खेळाडू नामदिर्देशित पदामध्ये 5 टक्के आरक्षण
नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी थेट नियुक्ती
आरक्षण लागू- राज्य शासनाची सर्व कार्यालये, ममहामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, वैधानिक मंडळे,विद्यापीठ, शासकीय शिक्षण संस्था इ. विभाग

स्व.खाशाबा जाधव चषक कुस्ती व छ. शिवाजी चषक कबडी, भाई नेरुळकर खो-खो, व्हॉलीबॉल चषक स्पर्धा

क्रीडा संस्कृतीची जोपासणा व वाढ होण्यासाठी विविध खेळाच्या माध्यमातुन युवा पिढीला खेळाकडे आकृष्ट करणे व त्यांच्यातील क्रीडा गुणांना बाब देण्यासाठी स्व.खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा व छ. शिवाजी चषक कबडी स्पर्धा, आंतररार्ष्टीय दर्जाच्या खेळाडू बरोबर खेळण्याची संधी तसेच भाई नेरुळकर खो-खो स्पर्धा, व्हॉलीबॉल चषक स्पर्धाचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात येते. कौशल्य पाहण्याची संधी राज्यातील खेळाडूंना मिळत आहे.
स्व.खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा रु. 50.00 लक्ष, छ.शिवाजी चषक कबडी स्पर्धा रु.50.00 लक्ष, भाई नेरुळकर खो-खो स्पर्धा रु.50.00 लक्ष तसेच व्हॉलीबॉल चषक स्पर्धा आयोजनासाठी तरतुद दिली जात नाही.

स्व.खाशाबा जाधव चषक स्पर्धा :-
कुस्ती कलेच्या विकासासाठी तसेच ऑलिपिंक पदक विजेते स्व.खाशाबा जाधव यांचे कार्याचा गौरव म्हणुन स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धा फ्री स्टाईल व ग्रीको रोमन व महिला गटात घेण्यात येतात. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमार्फत आयोजित वरीष्ठ गटातील प्रथम 9 स्थानावर असलेले संघ स्पर्धेसाठी पात्र ठरतात. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने निश्चित केलेले वजन गट नुसार फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला तसेच व्यवस्थापक-3, मार्गदर्शक-3 असा संघामध्ये समावेश राहतो. शासन या स्पर्धेसाठी रु.50.00 लक्ष इतके अनुदान उपलब्ध करून यामध्ये बक्षिसे, खेळाडू व पंच व अधिकारी याचा प्रवास खर्च, चषक प्रतिकृती व मेडल्स, निवास, भोजन, पंच मानधन, प्रेक्षक गॅलरी, स्टेज इ. बाबींवर खर्चा समावेश आहे. या स्पर्धा संयोजनासाठी मा.मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तर समिती असुन स्पर्धेचे ठिकाण व आर्थिक तरतुद उपलब्ध करुन देण्यात येते. स्पर्धेसाठी आयोजन समिती मा.पालकमंत्री महोदयाचे अध्यक्षतेखाली व मा.जिल्हाधिकारी कार्याध्येखाली गठीत केली जाते. उपसंचालक, क्रीडा विभाग हे सदस्य सचिव आहेत. तांत्रिक समिती, निवास, भोजन, वाहतुक, प्रसिध्दी, स्वयंसेवक, उदघाटन व समारोप, वैद्यकीय समिती गठीत करण्यात येतात. कुस्ती क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातुन खेळातील चढाओडी, स्पर्धात्मक दर्जा, कौशल्याचे सादरीकरण इ. व्दारे नविन खेळाडूंना या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या स्पर्धा अत्यंत उपयुक्त आहेत. छत्रपती शिवाजी चषक कबडी स्पर्धा :-
महाराष्ट्र व विदर्भ संघटना यांचे सहकार्याने आयोजित महाराष्ट्र 12 संघ व विदर्भ 4 असे 16 संघाचा समावेश, खेळाडू 12, व्यवस्थापक-1, मार्गदर्शक-1 यांचा समावेश असतो. कै.भाई नेरुळकर खो-खो स्पर्धा :-
महाराष्ट्र, कोल्हापुर व विदंर्भ संघटना यांचे सहकार्याने आयोजित, महाराष्ट्र-8, कोल्हापुर-1 व विदर्भ-3 असे एकुण 12 संघाचा समावेश असतो यात 12 खेळाडूचा एक संघ असतो, व्यवस्थापक-1, मार्गदर्शक-1, यांचा समावेश असतो तर वरीष्ठ गटात 12 व किशोर-किशोरी 8 संघ सहभाग नोंदवितात. व्हॉलीबॉल चषक स्पर्धा :-
या स्पर्धा 18 व 21 वर्षाआतील मुले/मुली, व 8 विभागातुन संघ सहभाग नोंदवितात.

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना

राज्यात क्रीडा संबंधीत, प्रचार व प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषण वातावरण असणे आवश्यक आहे. या भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आले आहे.

राज्यात क्रीडा संबंधीत, प्रचार व प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषण वातावरण असणे आवश्यक आहे. या भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आले आहे. या क्रीडा धोरणानुसार तालुका,जिल्ह, राज्य क्रीडा धोरण प्रशिक्षण केंद्राची स्थापनाव करणे या योजनेतंर्गत, राज्यातील क्रीडापटूंच्या क्रीडागुणाणा वाव मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व ग्रामीण व शहरी भागातील उदयोमुख खेळाडूंना अद्यावत कौशल्याचे प्रथिरुण देण्यासाठी जिहयाच्या ठिकाणी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र स्थापन करून खेळाडू बरोबर जिल्हयातील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक तसेच क्रीडा संस्थामधील प्रशिक्षंणासाठी चर्चासत्र, सेमीणार,परिसंवाद,कार्यशाळा तसेच उजळणी वर्गाचे आयोजन करण्यासंबंधी नवीन क्रीडा धोरणात तशी तरतुद करण्यात आली आहे.

राज्याचे युवा धोरण़

केंद्र युवांच्या गरजा ओळखून त्या गरजांच्या पुर्ततेकरीता शिका, नेतृत्व करा व योगदान द्या या सिध्दांतानुसार कार्यरत राहणार असुन शिक्षण, युवा सक्षमीकरणाकरीता विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, सेमीनार इ. आयोजन करण्यात येतात. सदर केंद्रा मार्फत विविध विषयांचे 10 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येते.

युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना :-
केंद्र युवांच्या गरजा ओळखून त्या गरजांच्या पुर्ततेकरीता शिका, नेतृत्व करा व योगदान द्या या सिध्दांतानुसार कार्यरत राहणार असुन शिक्षण, युवा सक्षमीकरणाकरीता विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, सेमीनार इ. आयोजन करण्यात येतात. सदर केंद्रा मार्फत विविध विषयांचे 10 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येते. राज्य युवा प्रशिक्षण केंद्र शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे, बालेवाडी, पुणे येथे स्थापन करण्यात आले असुन या केंद्र अंतर्गत 8 शिबीरांचे आयोजन करण्यात आलेली आहेत. राज्यातील सुमारे 500 युवांनी याचा लाभ घेतलेला आहे. अभ्यासक्रम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, केंद्र युवा विषयक योजनांची माहिती, सामुहिक सहभाग, समुपदेशन, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, युवा व्यक्तिमहत्व विकास, नेतृत्व, नेतृत्व गुण, सामाजिक विकास युवांचे योगदान, रोजगाराच्या संधी, व्यसनमुक्ती, संविधान व प्रशासन, माहिती अधिकार, शारीरिक तंदरुस्ती, युवाचा भावनिक विकास, यशस्वी व्यक्तिंचे मार्गदर्शन, मानवी अधिकार व हक्क इ. बाबींची माहिती देण्यात येते. सन-2016-17 या वर्षात रु.100.00 लक्ष मंजुर तरतुद आहे.
युवा पुरस्कार :-
राज्यात व जिल्हयात युवांनी केलेया समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने दि.12 नोव्हेंबर 2013 योजना कार्यान्वित केली आहे. प्रतिवर्षी जिल्हास्तरावर एक युवक,एक युवती व एक संस्थेस युवा पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरुप जिल्हास्तरावर युवक व युवतीस रोख रु.10000/- संस्थेस रु.50000/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा सहअध्यक्ष, नेहरु युवा समन्वयक, राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कारार्थी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. राज्य युवा पुरस्कारासाठी आठ विभागनिहाय राज्यस्तरावर युवक व युवतीस रोख रुपये 50000/- संस्थेस रुपये 100000/- तसेच गौरव पत्र, सन्मानचिन्ह असे आहे. मा.मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समिती गठीत असुन सन-2014-15 व सन-2015-16 या वर्षात पुरस्कारासाठी आठ विभागातुन प्रत्येकी एक युवक, एक युवती व एक संस्था यांची निवड केलेली आहे. सन-2016-17 या वर्षात रु.48.68 लक्ष इतकी मंजुर तरतुद आहे.
युवा वसतीगृहाची स्थापना :-
युवांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण, मुलाखती, मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी वेळोवेळी शहरामध्ये जावे लागते. अशावेळी त्यांना त्यांच्या निवासासाठी हक्काचे असे ठिकाण असणे अत्यावश्यक आहे. यासाठी महसुल विभागाच्या ठिकाणी, वसतिगृह स्थापन करण्यात येणार आहे. मुंबई, अमरावती, नागपुर, औरंगाबाद, नाशिक या विभागाचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. वसतिगृह स्थापन करण्यासाठी रु.400.00 लक्ष व व्यवस्थापनासाठी रु.12.00 लक्ष निधी देण्यात येणार आहेत. मुंबई,औरंगाबाद,नाशिक,नागपुर,अमरावती या विभागात करण्याचे ठरले असुन मुंबई रु.1.88 कोटी, औरंगाबाद रु.4.00 कोटी, अमरावती रु.3.80, नाशिक व नागपुर प्रत्येकी रु.3.70 लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला आहे. वसतिगृहामध्ये युवक व युवतींसाठी स्वतंत्र कक्ष 100 युवांसाठी किमान निवास व्यवस्था (30 टक्के महिलांसाठी राखीव), सभागृह, ई लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज इ. सन-2016-17 या वर्षात रु.14000.00 लक्ष मंजुर तरतुद आहे.
युवा महोत्सवाचे आयोजन :-
राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता व युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणंना वाव देण्यासाठी राज्यातील 13 ते 35 वयोगटातील युवकांसाठी जिल्हा,विभाग,व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये युवा महोत्सामध्ये लोकनृत्य,लोकगीत,एकांकिता (इंग्रजी व हिंदी) शास्त्रीय गाय (हिदुस्तानी),शास्त्रीय नृत्य, सितार,बासरी,तबला,विणा,मृदूंग,हार्मोनियम,गिटार,मणीपुरी नृत्य,ओडिसी नृत्य,भरतनाटयम,कथ्थक,कुचिपुडी नृत्य व वक्तृत्व इ. प्रकारच्या स्पर्धात्मक बाबीचा समावेश आहे. राज्याच्या प्रातिनिधिक संघ निवडून राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी करण्यात येते. दि.12 ते 19 जानेवारी दरम्यान प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन-2016-17 या वर्षात राष्ट्रीय युवा महोत्सव, रोहतक, हरीयाणा येथे सपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उल्लेखनीय कामगिरी करीत भरतनाटयम मध्ये प्रथम, मृदंग,बासरी,कथ्थक,वक्तृत्व या प्रकारामध्ये व्दितीय क्रमांक संपादनक केलेला आहे. सन-2016-17 या वर्षात रु.56.00 लक्ष मंजुर तरतुद आहे. युवा नेतृत्व व व्यक्तिमहत्व विकासासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे :- युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असुन युवांना मानव संसाधन विकासाच्या मुख्य स्त्रोतात त्यांची भूमिका परिणाम कारक होणे आवश्यक आहे. राज्यातील युवक कल्याण क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या उदेशाने युवांना जीवनात ध्येय निश्चित करण्यास मदत व्हावी, युवकांमधील नेतृत्व व व्यक्तिमहत्वाचा विकास घडविण्यासाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येते. वर्षातून 6 प्रशिक्षण शिबीरांचे आयोजनासाठी प्रत्येकी रु.3.15 लक्ष मंजुर करण्यात येतात. सन-2016-17 या वर्षात रु.18.90 लक्ष मंजुर तरदुत होती तर सांगली,नंदुरबार,औरंगाबाद,अमरावती,सिधुदूर्गे या जिल्हयात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
युवा विकास निधीची स्थापना :-
युवांना जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी युवांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, भौगोलिक, वैविधतचे ज्ञान, युवांचा सर्वकष विकास करण्यासाठी युवक कल्याण विषयक कार्यक्रमासाठी सहाय्य करण्यासाठी राज्य युवा विकास निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. युवा विकास निधी उभारणीसाठी राज्य शासनाचा वाटा रु.25.00 लक्ष आहे. औदयगिक व वाणिज्यक प्रतिष्ठाणे यांचे कडून देणग्या, कंपन्याकडून सामाजिक दायित्व निधी, युवा विषयक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमातुन जमा होणारा निधी जमा करण्याची तरतुद आहे. सन-2016-17 या वर्षात रु.35.00 लक्ष मंजुर तरतुद आहे.
रोजगार उपलब्धता प्रसिध्दी :-
रोजगार व स्वयंरोजगार (कौशल्य विकास) विभागाने रोजगार वेबपोर्टल विकसित केलेली आहे. त्यामध्ये नोकरी संबंधित जाहिरात व स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन प्रसिध्द केल्या जात आहेत. युवा संकेतस्थळ विकसित करणे :-

रोजगार व स्वयंरोजगार विभागाने ई प्रशासन प्रकल्पातंर्गत वेबपाट्रल विकसत केले असुन उमेदव्दारा त्यांचे कडील पात्रतेची नोंदणी करता येते.
कौशल्य विकास संस्था स्थापन करणे :-
राज्यातील मनुष्यबळाचे कौशल्य विकसीत करून मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगारव स्वयंरोजगाराच्या संधि उपलब्ध करून देणे, राज्यातील युवांमध्ये कौशल्य विकास करण्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास संस्थेची स्थापना केलेली आहे. देश पातळीवर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद व राज्यात ü “¸üÖ•µÖ व्यवसाय प्रशिक्षण परिषद ”ãÖÖ¯Ö®Ö करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह साजरा करणे

युवकांचा सर्वागिक विकास करणे आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी युवकांना उत्साहीत करणे.
राष्ट्रीय युवा सप्ताह दि. 12 ते 19 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात येते.


• दि. 12 ते 19 जानेवारी या कालावधीत स्वामी विवेकानंद याचे तत्वज्ञान व शिकवण,कार्य,प्रेरणादायी विचार युवांना अवगत करणे
• युवांसाठी परिसंवाद,कार्यशाळा,युवा विचारांचे आदान-प्रदान कार्यक्रम आयोजन
• समाजातील यशस्वी व्यक्तीसमवेत चर्चासत्र
• वादविवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला,सांस्कृतिक कार्यक्रम,चर्चासत्रे,संमेलन,निबंध,वादविवाद व वत्कृत्व स्पर्धा, समुहगान इ. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
• यात 15 ते 35 वयोगटातील युवांना सहभाग नोंदविता येतो.