जळगाव सिटी
Defender
  • प्रदेश
  • भाषा
  • लोकसंख्या
  • क्षेत्र
  • आम्हाला वर अनुसरण करा
  • 140 km2 (50 sq mi)
  • 750,000
  • मराठी
  • खान्देश

जळगाव

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पश्चिम क्षेत्रात वसलेले जळगाव शहर हे एक कृषि प्रधान शहर असुन व्यापार आणि शेती करिता एक प्रमुख केन्द्र म्हणुन जळगाव शहराची ओळख आहे. जळगाव शहर हे अजिंठा लेणीच्या दक्षिणेला तर नशिक शहराच्या उत्तरेस आहे. तसेच उत्तरेस सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेले आहे. पश्चिमेला असलेल्या धळे व पुर्वेस असलेल्या बुलढाणा जिल्हा साठी व्यापार आणि कृषि उत्पादनासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून सक्रिय आहे. जळगाव जिल्ह्याची महत्वपुर्ण बाब म्हणजे येथिल वातावरण अतिशय उष्ण असुन तापमान हे ४७॰ अंश पर्यन्तं पोहचते. जगप्रसिद्ध अंजिंठा लेणी हे जळगाव शहरापासून फक्त ५० किलोमिटर अंतरावर आहे.

पद्ममालय

भारतातील अडीच गणपति पिठांपैकी अर्धपीठ गणपति क्षेत्र म्हणुन पद्ममालय क्षेत्र ओळखले जाते. हे क्षेत्र टेकडीवर वसलेले असुन, मुख्य मंन्दिराच्या आजुबाजुस दोन छोटे गणपती मंदीरे आहेत. व मंन्दिराच्या समोरील बाजुस गोविन्दं महाराजांच्या पादुका असुन पादुका समोर एक मोठी घंटा आहे. व जवळच मोठा गाभारा आहे. या गाभाऱ्यात ३-४ फुट मुशकाची कोरिव उंच अशी प्रतिकृती आहे. येथे दोन स्वयंभु गणेश मुर्ति आहेत. त्यातल्या एका मुर्तिची सोंड उजव्या बाजुस तर दुसऱ्या मुर्तिची सोंड डाव्या बाजुस आहे, दोन्हि मुर्तिनां चांदीचा मुकुट आहे. हे क्षेत्र "प्रभाक्षेत्र" नावानेही ओळखले जात असुन ते एरंडोल तालुक्या पासुन ४.८ कि.मि. अंतरावर आहे. हे क्षेत्र गणपती आणि हनुमान मंदिरां साठि प्रसिद्ध आहे.

ओंकारेश्वर मंदीर

हे जळगाव शहरातील प्रसिद्ध आणि सुदंर असे भगवान महादेव यांचे मंदीर असुन शहरातील जय नगर परिसरात आहे. या मंदीरात शिवरात्री,श्रावण सोमवार रामनवमी तसेच गोकुळष्टमी हे प्रमुख दिवस मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

ईच्छापुर्ति गणेश मंदीर

ईच्छापुर्ति गणेश मंदीर जळगाव शहराच्या नविपेठ या भागात, बालाजी स्वीट मार्ट समोर आहे. दररोज या मंदीरात हजारो भक्तगण दर्शनाचा लाभ घेत असतात.

महात्मा गांधी उद्यान

शहराच्या मध्यवर्ति भागात नविन बस स्टॅन्ड जवळ असलेले महात्मा गांधी उद्यान हे अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसिध्द आहे. या उद्यानात लहान मुलानां खेळ्ण्या करिता नवनविन साधना सोबत येथे सुंदर अश्या रंगीबेरंगी फुलांच्या बाग ही आहेत.

मेहरूण

शहराच्या मध्यवर्ती भागात शिरसोली रोड स्थित मेहरूण पार्क शहरातील बगिचातील सर्वात जुने असे पार्क आहे .अतिशय सुंदर व निसर्गरम्य असे वातावरण असलेले ठिकाण नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करते. या पार्क चे उद्घाटन प्रसिद्ध सिनेकलाकार पृथ्विराजजी कपूर यांच्या हस्ते झाले आहे.या पार्क मध्ये मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध आहेत.साधारणपणे नागरिक सुट्ट्यांमध्ये किंवा रविवारी या पार्क मध्ये आपल्या सुट्ट्या घालवतात व मनोरंजनाचा आनंद उपभोगतात.