जिल्हा क्रिडा संकुल

महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण सन २००१ शासन निर्णय क्र . राक्रिधो-२००३/प्र. क्र . ११/क्रियुसे -१, मंत्रालय विस्तार भवन मुंबई -३२ दि२६./३/२००३ नुसार आंतर राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी विविध खेळांच्या सोई सुविधांसह जिल्हा क्रीडा संकुले उभारव्याची आहेत.

जळगांव जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची स्थापना करून मा. सहाय्य्क धर्मदाय आयुक्त,जळगांव यांचेकडे नोंदणी करण्यात आलेली आहे. संकुल कार्यकारिणी समितीमध्ये मा. जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून जिल्हा क्रीडा अधिकारी हे सदस्य सचिव आहेत त्याशिवाय मा. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. मुख्यकार्यधिकारी जी. प. मा. आयुक्त,महानगरपालिका मा. कार्यकारी अभियंता , सा . बां .विभाग , मा. उपसंचालक , क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, मा. शिक्षणाधिकारी प्राथ . व माध्य, जि . प., या. जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे.

 • छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल प्रवेशद्वार

 • स्वागत कक्षाचे आकर्षक प्रवेशद्वार

 • टेबल टेनिस, बॅडमिंटन हॉलसाठी प्रवेश

 • छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.या खेळाच्या प्रचंड लोकप्रियतेच्या कारणांपैकी एक कारण या खेळाला मूलभूत पातळीवर अतिशय कमी सामग्रीची आवश्यकता असते जसे मोज्यांचा बॉल ,दगडाचा गोलपोस्ट आणि काही मित्रांचा संघ.असा खेळ भारतासाठी एक आदर्श आहे जेथे संसाधने दुर्मिळ आहेत, परंतु प्रतिभा, ऊर्जा आणि आवड यांची कमतरता नाही.

भारत 2017 साली फीफा अंडर -17 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे.परंतु यशस्वीरीत्या आयॊजन करणे हाच या मागील हेतू नाही .फीफा अंडर -17 हा भारतासाठी उत्प्रेरक बदल घडवून आणणार आहे. या करीता भारतातील प्रत्येक मुलाने सहभाग घेणे आवश्यक आहे भारतातील प्रत्येक राज्यातील मुलांनी फूटबॉल खेळायला हवा .मला विश्वास वाटतो कि भारतातील मुले देशाच्या फुटबॉलला जगाच्या पाठीवर योग्य ठिकाणी पोचवतील.

 • डॉ.श्री.अविनाश ढाकणे

  भा. प्र .से

                महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा परिषद,तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व्दारा आयोजित सन 2019-20 मध्ये आयोजित करण्यात येणार असलेल्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा, क्रीडा विभागाच्या विविध योजना व उपक्रम यांची माहिती देणारी पुस्तिका आपल्या हाती सुपुर्द करतांना मला मनस्वी आनंद होत आहे.

                क्रीडा व शालेय शिक्षण या एकमेकांना पूरक अशा बाबी आहेत. व्यक्तिमत्व विकासाकरिता शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धांमधील सहभागही महत्वाचा आहे. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या शारीरिक क्षमता, निर्णयशक्ती, अनुशासन, समन्वय या बाबी क्रीडांगणावरील प्रत्यक्ष सहभागाशिवाय शिकता येऊ शकणार नाही.

                सर्व क्रीडा स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडु प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण, शिक्षक व एकविध खेळांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !

 • श्री.चंद्रकांत कांबळे

  उपसंचालक नाशिक विभाग

               महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे वतीने जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , जळगाव महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने सन 2019-20 मध्ये आयोजित करण्यात येणा-या विविध स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा क्रीडा विभागाच्या विविध योजना व उपक्रम यांची माहिती यात देण्यात आलेली आहे.

               जळगाव शहरातील व जिल्हयातील प्रत्येक शाळेने या वर्षाच्या क्रीडा स्पर्धेत न चुकता सहभागी होऊन जळगाव जिल्हयाचे नाव वृध्दिंगत करावे. तसेच या वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेस तसे उत्तेजन देऊन सर्व मुख्याध्यापक प्राचार्य, क्रीडा शिक्षक, संघटना पदाधिकारी व पालक वर्गाला या पुस्तिकेव्दारे आवाहन करित आहे.

               क्रीडा विषयक सर्व माहिती, वेळापत्रक, शासन परिपत्रक सर्व शाळा यांना विविध स्पर्धांकरिता ही माहितीपुस्तिका मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.हार्दिक शुभेच्छा!

 • श्री मिलिंद दिक्षित

  जिल्हा क्रीडा अधिकारी

               महाराष्ट्र शासनाच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2019-20 मध्ये आयोजित करण्यात येणार असलेल्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा, विभागाच्या विविध योजना व उपक्रम यांची माहिती देणारी पुस्तिका आपणासाठी तयार करण्यात आलेली आहे.

                मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-1 आणि मा. जिल्हाधिकरी, जळगाव याचे कुशल मार्गदर्शनानुसार जिल्हा क्रीडा परषिद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा संकुल जळगाव हे विविध उपक्रमाव्दारे यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहे. त्यास जळगाव शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव आणि जिल्हयात कार्यरत असणाऱ्या विविध एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी,युवक मंडळे, क्रीडा मंडळे यांचे पदाधिकारी या सगळयांचे अनमोल सहकार्य सातत्याने लाभत असल्यामुळे जळगाव जिल्हयाच्या क्रीडा क्षेत्रात होणा-या प्रगतीला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांचा देखील मोठा सहभाग आहे.