Loading. Please wait.

क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव

क्रीडांगण विकास अनुदान मागणी अर्ज

(अर्जाच्या तपशीलमधील माहिती परिपूर्ण भरावी व खालील दिलेल्या अणुक्रमांकानुसारच कागदपत्रे जोडावीत )

संस्थेचे संपूर्ण नाव व पत्ता*

   

संस्थेद्वारे संचालित प्राथ./ माध्य. शाळा / कनिष्ठ महा/आश्रमशाळा /शासकीय आश्रमशाळा त्याचे नाव व पत्ता*

   

संपर्कासाठी संस्थेचा /पदाधिकारी यांचा दूरध्वनी क्रमांक/ भ्रमणध्वनी (मोबाइल) क्रमांक नमूद करावा *

                 

संस्थेचा ई -मेल आयडी

अनुदान मागणीच्या प्रस्तावासोबत जोडलेली कागदपत्रे संस्था संदर्भात ,माहिती सत्य व बरोबर असल्याबाबत व प्रत्येक पृष्ठावर स्वाक्षरी बाबत प्रतिज्ञापत्र सही व शिक्क्यानिशी रु . १००/- चे कोर्ट फी स्टॅम्प लावून जोडावे

अनुदान मागणी प्रकल्प योजनेचे नाव*

 

आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुदान मागणी असल्यास प्रकल्पाचे गाव हे आदिवासी भागातील असल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे

चालू आर्थिक वर्षात ज्या प्रकल्पासाठी अनुदान मागणी करण्यात येत आहे ती बाब नमूद करावी*

 

संस्था नोंदणी अधिनियम १८६० नुसार नोंदणीकृत प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी

संस्था मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० नुसार नोंदणीकृत प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी

संस्थेच्या घटनेची /उद्दिष्ट मा. धर्मदाय आयुक्त यांनी मान्य केलेली साक्षांकित प्रत उद्दिष्टसह जोडावी

सध्या स्थितीत संस्थेच्या कार्यकारणीत असलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी त्यांच्या कालावधीसह रु २०/- च्या स्टॅम्प पेपर वर अफेडीव्हीट करून जोडावी

ठराव : अनुदान मागणीचा प्रस्ताव मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी सादर केला असल्यास त्यांनी प्रस्ताव सादर करणे व त्याबाबत पुढील सर्व कार्यवाही करणेबाबत संस्थेने दिलेले अधिकारपत्र /त्याबाबत केलेल्या ठरावाची प्रत जोडावी

ठराव : प्रकल्पासाठी शासकीय अनुदान घेणेबाबत व अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव यांचे कडे सदर करणे व शासन अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित ज्यादा होणारा खर्च संस्थेमार्फत करून प्रकल्प पूर्ण करण्यात येईल , याबाबत संस्थेच्या ठरावाची प्रत जोडावी( संस्थेच्या मूळ प्रोसिडिंग बुक ची झेरॉक्स जोडावी

संस्थेच्या मालकीच्या जागेबाबत ७-१२/८-अ चा अद्यावत उतारा /नोदानिकृत ३० वर्ष्पेक्षा जास्त दीर्घ मुदतीचे करारपत्र/दानपत्र/बक्षीसपत्र खरेदीखत जोडावे.

प्रकल्प राबवीत असलेल्या जागेबाबत महाराष्ट्र महसूल अभिलेखामधील फेरफार नोंदवहीची प्रत/हक्कपत्र/इतर आवश्यक कागद्पत्र जोडावी

जागेच्या मालकी हक्काबाबत इतर आवश्यक कागदपत्र सोबत जोडावीत

जागेचा चतु :सीमा दर्शविणारा नकाशा प्रत अधिकृत अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जोडावी

एकूण ताब्यात असलेल्या मोकळ्या जमिनीचा तपशील:-एकूण क्षेत्रफळ हेक्टर /एकर /आर मध्ये नमूद करावे *

 

त्यापैकी फक्त क्रीडांगणाकरिता राखून ठेवलेल्या जमिनीचा तपशील *

 

अनुदान मागणी केलेल्या प्रकल्प ठिकाणाचा व राबवित असलेल्या प्रकल्पाच्या जागेचा नामफलकासह फोटो (छायाचित्र) जोडावा

प्लॅन अँड एस्टीमेट :- काम करावयाच्या प्रकल्पाचे अंदाजपत्रक व आराखडा शासकीय अभियंता / उपअभियंता / अधिकृत अभियंता /नोंदणीकृत वास्तुविशारद तज्ञ् यांनी मान्य केलेले जोडावे

अनुदान मागणी केलेल्या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक व आराखडा नुसार एकूण येणारा खर्च रक्कम रुपये नमूद करावा *

 

बांधकाम परवानगी पत्र :- क्रीडाविषयक बाबींच्या प्रकल्पास व बांधकामास संबंधित ग्रामपंचायत /नगरपालिका /महानगरपालिका यांची परवानगी /नाहरकत प्रमाणपत्र (सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेली प्रत )त्यात प्रकल्पाच्या स्थळाचा व जागेचा सर्वे नं ./गट नं यांचा स्पष्ट उल्लेखासह परत जोडावी

बँक बॅलन्स प्रमाणपत्र :-संस्थेचे बँक बॅलन्स प्रमाणपत्र अर्जासोबत जोडलेल्या विहित नमुन्यात बँकेतील शिल्लक रकमेपैकी आवश्यक रक्कम नियोजित प्रकल्पासाठी राखून ठेवल्याचे प्रमाणपत्र प्रत जोडावे तसेच बँकेतील बँक बॅलेन्स प्रमाणपत्राची मूळ प्रत जोडावी

ऑडिट रिपोर्ट :-संस्थेचे मागील ३ वर्षाचे मा. धर्मदाय आयुक्तांना सादर केलेली लेखविवरण पत्रे (ऑडिट रिपोर्ट) जोडावा (चालू वर्षातील गेलेल्या ३१ मार्च पर्यंतचा रीपोर्टसह मागील ३ वर्षाचा रिपोर्ट जोडावा )

क्रीडा विषयक अहवाल :-संस्थेच्या /शाळेच्या /महा क्रीडा स्पर्धेचा सहभागाबाबत मागील २ वर्षाबाबतचा सविस्तर अहवाल प्रत जोडावी व त्याबाबत योग्य पुरावे व प्रमाणपत्रांच्या प्रति जोडाव्यात

क्रीडा प्रशिक्षक नेमणूक :-क्रीडा विषयक बाबींसाठी प्रस्ताव असल्यामुळे /क्रीडा साहित्यासाठी प्रस्ताव असल्यामुळे संस्थेकडे प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांची नेमणूक केली असल्याबाबत त्यांची नेमणूक पत्र व त्याच्या शारीरिक शिक्षण शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रति सोबत जोडाव्यात

क्रीडांगणं सुस्थितीत: अनुदानाची मागणी बांधकामासाठी किंवा क्रीडा साहित्यासाठी असल्यास संस्थेकडे क्रीडांगण उपलब्ध असून सुस्थितीत आहे व ते वापरण्यास योग्य असून त्यांच्या संबंधित प्रकल्पासाठी अनुदानाची मागणी केलेली आहे याबाबत माहिती सोबत जोडावी

क्रीडा साहित्यासाठी प्रस्ताव असल्यास : मागणी केलेल्या साहित्याशी संबंधित मैदाने /हॉल संस्थेकडे उपलब्ध आहेत अशा मैदानांची /हॉलचा फोटो यादी व माहिती संस्थेच्या लेटरपॅडवर जोडावी

क्रीडा साहित्यासाठी प्रस्ताव असल्यास : मागणी केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागा /हॉल/भंडारगृह उपलब्ध आहेत याबाबत माहिती संस्थेच्या लेटरपॅडवर जोडावी

क्रीडा साहित्यासाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव असल्यास : आवश्यक साहित्याची यादी सोबत जोडावी

क्रीडा साहित्यासाठी प्रस्ताव असल्यास : जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय जळगाव यांच्याकडून अनुदान मागणी प्रस्तावास तत्वतः मंजुरी मिळाल्यास अंदाजपत्रकाच्या २५% रक्कम अथवा शासन अनुदान मर्यादेव्यतिरिक्त संस्थेच्या अनुदेय हिस्सा म्हणून येणारी रक्कम रु -------धनाकर्षद्वारे मा. जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांच्याकडे त्यांनी दिलेल्या वेळ मर्यादेत जमा करण्यात येईल याबाबत हमीपत्र जोडावे

शैक्षणिक संस्था असल्यास शिक्षण विभागाचे मान्यता पत्र शाळा अधिकृत असल्याचे कागदपत्र जोडावीत

संस्थेस यापूर्वी मंजूर केलेल्या अनुदानाचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे जोडावा
१. अनुदानाचे वर्ष
२. अनुदानाची रक्कम रुपये
३. अनुदान प्राप्त प्रकल्पाचे नाव
४. प्रकल्पावर झालेला एकूण खर्च
५. संस्थेचा नियमाप्रमाणे हिस्सा रुपये

यापूर्वी प्राप्त अनुदानाचे विनियोग प्रमाणपत्र /ऑडिट रिपोर्ट /काम पूर्णत्वाचा दाखला व केलेल्या कामाचे फोटो सोबत जोडावेत

प्रस्तावा सोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येक पेज वर प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्था अध्यक्ष / सचिव किंवा मुख्याध्यापक /प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का

प्रस्तावासोबत खालील हमीपत्र जोडावीत
(सर्व हमीपत्र संस्थेच्या एकाच लेटरपॅड क्रमाने घ्यावीत )