जिल्हयातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा. व त्यांना युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक , एक युवती , एक नोदणीकृत संस्था यांना युवा पुरस्कार प्रतिवर्षी शासनामार्फत देण्यात येतो . जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव मार्फत सन 2018-19 व सन 2019-20 या दोन वर्षाच्या पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना सदर पुरस्कार देण्यात येइल. सदर पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात भरुन केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे ( वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो इत्यादी) जोडून सादर करावायाचा आहे. पुरस्काराकरिता प्रस्ताव प्रथम ऑनलाईन सादर करावयाचा आहे. त्यानंतर प्रस्तांवाची एक प्रत कार्यालयात जमा करावयाची आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी | दि.०७ ते २८ डिसेंबर २०२० |
अर्जदाराने ऑनलाईन हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचा दिनांक | दि. २८ डिसेंबर २०२० पर्यन्त |
ऑनलाईन अर्ज भण्याची वेबसाईट | jalgaonsports.in |
ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहिती करीता संपर्क क्रमांक |
|